मैत्री

Posted on: 2020-10-26 18:00:42 +0530 | Tags: friendship


अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होवून जाणं म्हणजे…. मैत्री…

तुमच्या सारखी खूप खूप गुणी… अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी….जशी कायम बहरलेली सदाफुली… म्हणजे…… मैत्री…!!

हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा.. म्हणजे…. मैत्री….

मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा… म्हणजे…. मैत्री…!!

मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन् तुमच्या शी बोलताना विसर *पडलेला शीण म्हणजे…. मैत्री…!

अगदीच महागडं सुंदर *फुलझाड नसेलही पण दुर्मिळ गवताचं एक नाजुक पातं… म्हणजे…. मैत्री….

देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं म्हणजे…. मैत्री…!!

उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं असं पान….. म्हणजे…. मैत्री…!!

हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी.. अन्…. स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची अशी ही कहाणी… म्हणजे…. मैत्री…

Source: Internet