गाव

Posted on: 2020-11-01 22:50:14 +0530 | Tags: blogआनंदघन


डोंगरदऱ्या आणि झाडेवेली, गावची कुशी माझ्या भरून गेली…

भक्तीने मंन भरून आली, दैवाची तशी खुप साथही मिळाली…

उन्हाळ्यात अंगणे भरून गेली, त्यात गप्पांची मैफिल छान सजली…

हसणाऱ्या रात्रीने चांदण्यांची चादर ओढली, सुखदुःखात एकमेकांच्या सर्व भिजून गेली…

गावची यात्रा कशी गच्च भरली, पण कुणी कुणाची इर्षा नाही केली…

पावसाळ्यात घरे गळत होती, शाळेलाही दांडी मारली, ती मज्जा काही निराळीच भारली…

खरच येतील का ते दिवस परत गावाकडच्या वाटेवरचे, की शब्द छेडून गेलं मनाला आठवणींचे…

- आनंदघन

Source: bhood.in