बालपण

Posted on: 2020-11-27 14:39:01 +0530 | Tags: blogआनंदघन


संत तुकाराम महारजांनी आपल्या अभंगातून सांगितलं आहेच…

“लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा”

जेव्हा जेव्हा मी लहान मुलांकडे त्यांची बाललीला पाहते तेव्हा तेव्हा अस नेहमी वाटतं का आपण मोठे का झालो माझं लहानपण मला परत मिळणार नाही…खरंच मला जगायचं आहे आणि पुन्हा एकदा फक्त लहान होऊनच जगायचं आहे…..

आज या आयुष्याचा वळणावर देवाकडे मागून परत तेच बालपण भेटेल का?

का,नाही भेटणार! नक्की भेटेल पण आपल्याला ते शोधावं लागेल….हो,पण कुठे आणि कस?

पण उत्तर अगदीच सोप आहे असं मला वाटतं..

लहानपण लहान मुलांच्याबरोबरीने आपणही तसेच बागडलो तर भेटेल की..

आयुष्यात येणारे दुःख क्षणिक आणि सुख खुप आहेत असा विचार केला तरीही कदाचित लहान मुलासारखा सगळ्या गोष्टींचा आनंद आपणही घेऊ शकतो..

लहान मूल कुठे पडलं , कोणी रागवल तरीही थोडा वेळ रडून उठून पळतच किंवा त्या लोकांमधे रमून जातच हो ना!

मग आपणही सगळं विसरून पुढे गेलो तर एक दिवस नक्की त्या लहान मुलासारखे बागडायला लागू….

यावर आपणही नक्की विचार करू…

- आनंदघन

Source: bhood.in